विराटचा खेळाडू अखेर बोहल्यावर चढला, कोरोनामुळे दोनदा रद्द झालं होतं लग्न
ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पा (Adam Zampa) याने अखेर लग्न केलं आहे. एडम झम्पा त्याची गर्लफ्रेंड हॅटी पार्मरसोबत (Hattie Leigh Palmer) विवाहबंधनात अडकला.
ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पा (Adam Zampa) याने अखेर लग्न केलं आहे. एडम झम्पा त्याची गर्लफ्रेंड हॅटी पार्मरसोबत (Hattie Leigh Palmer) विवाहबंधनात अडकला. या दोघांनी मागच्या आठवड्यात लग्न केलं आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून याची घोषणा केली.
2/ 7
एडम झम्पाची पत्नी हॅटी पार्मरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेयर केले आहेत. (Photo- Hattie Palmer Instagram)
3/ 7
एडम झम्पा आणि हॅटी यांचं लग्न दोनवेळा कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आलं होतं. आता मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Photo- Hattie Palmer Instagram)
4/ 7
एडम झम्पा आणि हॅटी पार्मर बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये होते. हॅटी बरेचवेळा एडमसोबत परदेश दौऱ्यावरही जायची. (Photo- Hattie Palmer Instagram)
5/ 7
हॅटी एडमसोबत 2017 साली भारतात आली होती, तेव्हा एडम आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट्सकडून खेळत होता. त्यावेळी दोघं सोशल मीडियावर अपशब्द लिहिल्यामुळे ट्रोल झाले होते. (Photo- Hattie Palmer Instagram)
6/ 7
एडम झम्पा लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यात दिसेल. ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिजमध्ये वनडे आणि टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. (Photo- Hattie Palmer Instagram)
7/ 7
एडम झम्पा आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीकडून खेळतो, पण कोरोना काळात बायो-बबलमधल्या मानसिक थकव्यामुळे झम्पाने आयपीएलमधून त्याचं नाव परत घेतलं होतं. (Photo- Hattie Palmer Instagram)