

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर 360 डिग्री या नावानं प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. एबीच्या घरी एका परीचा जन्म झाला आहे. एबीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. (Danielle de Villiers/Instagram)


एबीनं पत्नी डेनिअल डिव्हिलियर्स (Danielle de Villiers) आणि आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. एबीच्या मुलीचा जन्म 11 नोव्हेंबर 2020 रोजी झाला. (Danielle de Villiers/Instagram)


एबीनं डेनिअल आणि लेकीसोबत फोटो शेअर करताना, जगातील सुंदर बेबी गर्लचे स्वागत आहे. एबीनं आपल्या मुलीचे नाव येंते डिव्हिलियर्स ठेवल्याचे सांगितले. तसेच, तू आमच्या परिवारासाठी आशीर्वाद आहेस, आम्ही आभारी आहोत, असे कॅप्शन दिले आहे. (Danielle de Villiers/Instagram)


एबी आणि डेनिअल यांनी दोन मुलंही आहे. अब्राहम डिव्हिलियर्स ज्युनिअर आणि जॉन रिचर्ड डिव्हिलियर्स अशी मुलांची नावं आहेत. अब्राहम डिव्हिलियर्स ज्युनिअरचा जन्म 2015 आणि जॉन रिचर्डचा जन्म 2017ला झाला. (Danielle de Villiers/Instagram)


एबी आणि डेनिअल यांनी लव्हस्टोरी मजेदार आहे. एबीनं डेनिअलला भारतात प्रपोज केलं होतं. ताजमहलसमोर त्यांनी डेनिअलला लग्नाची मागणी घातली होती. 2013मध्ये दोघांनी विवाह केला. (Danielle de Villiers/Instagram)