पात्रता फेरीत निकोलस पूरनच्या वेस्ट इंडिज संघाला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला तो आयर्लंडकडून. तीन सामन्यात 2 वेळा हरल्यानं वेस्ट इंडिजचा संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला. क्रिकेट चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का होता. कारण टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे ज्यानं 2 वेळा विजेतेपद पटकावलं आहे.