....[wzslider]30 मे : सनरायझर्स हैदराबाद यंदाची आयपीएल चॅम्पियन्स ठरली आहे. बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 रन्सनी पराभव केला. आधी बॅटिंग करताना एसआरएचनं 208 रन्स केल्या होत्या. आयपीएलच्या फायनलमध्ये आतापर्यंतचा हा सर्वात जास्त स्कोअर आहे. एसआरएचचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं 38 बॉल्समध्ये 69 रन्स केल्या. जिंकण्यासाठी आरसीबीला 209 रन्स करायच्या होत्या. पण त्यांची संपूर्ण टीम 200 रन्स काढू शकली. ख्रिस गेलनं 38 बॉल्समध्ये 76 आणि विराट कोहलीनं 35 बॉल्समध्ये 54 रन्स केल्या. पण त्यांचे बाकीचे बॅट्समन काहीच प्रभाव पाडू शकले नाहीत आणि सनरायझर्स हैदराबादनं ट्रॉफी पटकावली. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv