[wzslider] श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराने क्रिकेट जगताला अखेरचा अलविदा केलाय. संगकाराने अगोदरच वन डे क्रिकेटला अलविदा केलाय. आजच्या आपल्या कारकिर्दीतली अखेरची टेस्ट मॅच खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. पण, या निरोपाच्या टेस्टमध्ये संगकाराला अविस्मरणीय खेळी करता आली नाही. अश्विनने त्याला सलग चौथ्यांदा आऊट केलं. सांगता कसोटीत शतकी खेळी करून श्रीलंकेला विजयी करण्याचे संगकाराचे स्वप्न अपूर्ण राहिलं. 18 रन्स करून संगकारा आऊट झाला. अश्विनचा चेंडू पुढे खेळायचा की मागे हा संगकाराचा विचार पूर्ण होण्यापूर्वीच चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करून दुसर्या स्लिपमध्ये स्थिरावला. संगकारा आऊट झाल्यामुळे स्टेडियमवर एकच शांतता पसरली. संगकारा पव्हेलियनकडे परतला तेव्हा स्टेडियममध्ये कच टाळ्यांचा कडकडाट झाला. भारतीय खेळाडूंनी संगकाराला मोठ्या सन्मानाने अखेरचा निरोप दिला. संगकाराने आपल्या कारकिर्दीत 38 शतक ठोकले आहे. तसंच 134 टेस्टमध्ये 13,400 रन्स केले आहे. श्रीलंकनं टीमचा सर्वात मोठा चाहत्याने श्रीलंकचा झेंडा फडकावत या महान खेळाडूला मैदानाबाहेर सोडलं. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv// <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?'http':'https';if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+'://platform.twitter.com/widgets.js';fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, 'script', 'twitter-wjs'); // ]]> +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++