

HONOR 9A एक कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन आहे. मॅजिक UI 3.1 सह अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिम आणि इतर लेटेस्ट फीचर्सने सुसज्ज आहे.


HONOR 9A मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. 33 तासांपर्यंत 4G कॉलिंग, 35 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक किंवा 37 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक वापरू शकता.


आपण या फोनच्या माध्यमातून रिव्हर्स चार्जिंग सुद्धा करू शकतो. USB OTG सपोर्टच्या माध्यमातून हे करता येईल. 5V 1.2A वर ही चार्जिंग करता येईल.


HONOR 9A मध्ये मोठे इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये आपल्याला 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल, ज्याला आपण 512 GB पर्यंत एक्सटर्नल स्टोरेजने वाढवू शकता.


HONOR 9A मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यामध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा, 5MP सुपर वाइड अँगल कॅमेरा आहे, ज्यातून 120 डिग्री FOV आणि डिस्टॉर्शन करेक्शन टेक्नोलॉजी आहे. यासोबतच यामध्ये 2MP चा डेप्थ असिस्ट कॅमेरा सुद्धा आहे. क्लिअर सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा लावण्यात आला आहे.


HONOR 9A मध्ये 6.3 इंच ड्युड्रॉप फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. याचा डिस्प्ले 1600x720 HD+ resolution सह 278 PPI आणि 16.7 मिलिअन कलर प्रदान करते. अधिक वेळ स्मार्टफोन वापरूनही डोळ्यांना त्रास होणार नाही. यासाठी यामध्ये Eye Comfort मोड देण्यात आला आहे. हे फीचर TUV Rheinland मार्फत सर्टिफाइड आहे.


HONOR 9A मध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे फेस अनलॉक तंत्रज्ञान. आपल्याला कमी उजेडातही फोनकडे पाहून ते अनलॉक करता येईल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा आहे.


HONOR च्या फ्लॅगशिप Magic UI 3.1 वर आधारित आहे जे Android 10 वर चालते. डार्क मोड फीचरमध्ये रात्री सुद्धा चांगला रीडिंग एक्सपिरिअंस मिळेल.