

दिवसाच्या तुलनेत रात्री त्वचेचा पोत सुधारण्याचं काम होत असतं. कारण झोपेत आपल्या त्वचेलाही विश्रांती मिळते. रात्रीच्या वेळी त्वचा सक्रिय घटक अधिक प्रमाणात शोषून घेते आणि रात्री झोपेत त्वचेच्या पेशीनिर्मितीचा वेग अधिक असतो. रात्री रक्ताभिसरण अधिक वेगात होते आणि स्कीन केअर उत्पादनांमधील पोषक घटकांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते.


रात्री त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या सल्लागार डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो सर्जन डॉ रिंकी कपूर यांनी अधिक मार्गदर्शन केलं आहे


रात्री झोपण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहरा पाण्याने स्वच्छ करणं, यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. त्वचेला नैसर्गिक क्लिझिंग, टोनिंग आणि मॉश्चराईझिंग ट्रिटमेंट मिळाल्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते.


नाईट क्रिम लावल्यामुळे सकाळी तुमच्या त्वचेला ताजेपणा व उजळपणा प्राप्त होतो. कोणत्या त्वचेसाठी कोणते नाईट क्रिम वापरणे योग्य आहे, त्याचा त्वचेवर काय आणि कसा परिणाम होईल याची माहिती असू द्या. मात्र वारंवार वापरू नका, याच्या अतिवापरामुळे मुरमंही येऊ शकतात.


त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर सीरम लावणे गरजेचे आहे. तुम्हाला हवे असल्यास अँटी एजिंग सीरमचाही वापर करू शकता. त्वचा तेलकट असल्यास तुम्ही सॅलिसिलिक अॅसिड आणि रेटिनॉल फेस सीरम लावा. घरगुती सीरम म्हणून तुम्ही कोरफडीचा रस काढून एका बाटलीमध्ये साठवून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा. पण ताज्या रसाचा वापर नेहमी करावा.


रात्री झोपण्याआधी त्वचेला मॉश्चराइजरच्या मदतीने मॉश्चराइज करणे फार चांगली सवय आहे. यामुळे त्वचेवरील डेड स्कीन तर निघेलच सोबतच त्वचेला पोषण देखील मिळेल.