

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याचा मैदानावरील कूल अंदाज सर्वांना माहित आहे. तो त्याच्या कुटुंबीयांबरोबर देखील वेळ घालवताना पाहायला मिळतो. त्याचा मुलगा जोरावर देखील कायम प्रसिद्धीझोतात असतो. मात्र त्याची मुलली आलियाने (aliyah dhawan) पुण्याचं काम करत तिची ओळख बनवली आहे.


खरतंर आयशा मुखर्जीच्या या लग्नाआधी दोन मुली आहेत. शिखर धवनशी तिने दुसरं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी जोरावरला जन्म दिला. मात्र शिखरने लग्नानंतर आलियाला देखील त्याचं नाव दिलं आणि आता त्यांच्यातील बाँडिंग पाहत हे मानण मुश्किल आहे की आलिया त्याची सावत्र मुलगी आहे.


आलियाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्वत:चही मुंडण केल्यानंतर ती चर्चेत आली होती. कॅन्सर रुग्णांचे समर्थन करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता.


मुलीने केस कापल्यानंतर धवनची बायको आयेशानेसुद्धा तिचे फोटो शेअर केले होते. तिने लिहिलं की, तु करून दाखवलंस, मला अभिमान आहे की तु माझी मुलगी आहेस. तु नेहमी आनंदी रहावीस.