

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षीनं (Sakshi Dhoni) 19 नोव्हेंबर रोजी 32वा वाढदिवस साजरा केला. धोनी आपल्या परिवारासह सध्या दुबईमध्ये आहे. त्यामुळे साक्षीचा वाढदिवसही मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.


सोशल मीडियावर साक्षी धोनी आणि झिवाचे फोटो अपलोड करत असते. बाप-लेकीचं नात खुपच गोड असल्याचं फोटोमधून कळते. साक्षीनेही एका मुलाखतीदरम्यान झिवा फक्त माहीचं ऐकते असे सांगितले होते.


झिवाचा जन्म 6 फेब्रुवारी 2015मध्ये झाला, त्यावेळी धोनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. 30 जानेवारीपासून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपला सुरुवात झाली. त्यावेळी धोनी संघाचा कर्णधार होता. त्यामुळे झिवाच्या जन्माच्या वेळी धोनी भारतात परतू शकला नाही.


धोनी वर्ल्ड कप सामन्यात व्यस्त असल्यामुळे झिवाच्या जन्माची बातमी साक्षीनं धोनी आधी सुरेश रैनाला दिली होती. वर्ल्ड कप दरम्यान धोनी सरावात व्यस्त होता.