

भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदल यांचा पहिला क्रमांक लागतो. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्या 14 व्या क्रमांकावर आहेत. 42 हजार 900 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालिकण असलेल्या सावित्री जिंदल यांना आशियातील सर्वात श्रीमंत महिला असेही म्हटले जाते.


श्रीमंत महिलांच्या यादीत बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार शॉ या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 25 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.


हॅवल्सच्या विनोद गुप्ता यांची संपत्ती 19 हजार 600 कोटींच्यावर आहे. श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत त्या तिसऱ्या स्थानावर आहेत.


गोदरेजच्या स्मिता कृष्णा-गोदरेज या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 18 हजार 900 कोटी इतकी आहे.


युएसव्ही इंडियाच्या अध्यक्ष असलेल्या लीना तिवारी या श्रीमंत भारतीयांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 13 हजार 300 कोटी इतकी आहे.