हिंदू धर्मात लग्नाला फक्त दोन व्यक्तींचे मिलन मानलं जात नाही तर दोन कुटुंबांचे मिलन मानले जाते, परंतु तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अक्षदा पडताना किंवा सातफेरे घेताना आई तिथे उपस्थित राहत नाही. म्हणजे आई मुलाचे सातफेरे पाहत नाही. यामागचे नेमके कारण काय? जाणून घेऊया दिल्लीचे ज्योतिषी पंडित आलोक पंड्या यांच्याकडून.
गृहप्रवेश हे देखील एक कारण - लग्नानंतर वधू जेव्हा सासरच्या घरी पोहोचते तेव्हा तिचा गृहप्रवेश सोहळा पार पाडला जातो. यावेळी वधूची ओवाळणी केली जाते आणि दारात उंबरठ्याजवळ कलशात तांदूळ ठेवला जातो. वधू या कलशाला पायाने ढकलून घरात प्रवेश करते. यानंतर वधूच्या हातावर हळद लावली जाते. या विधीला गृहप्रवेश म्हणतात. मान्यतेनुसार या विधीच्या तयारीसाठीही आई मुलाच्या लग्नाला जात नाही.