हिंदू संस्कृती ही सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध म्हणून ओळखली जाते. हिंदू वर्षभर अनेक सण साजरे करतात.
2/ 8
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र (हिंदू महिना) शुक्ल पक्षाचा पहिला दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आवर्जून दिल्या जातात.
3/ 8
रेशमी वस्त्र: हे रंग आपले जीवन फुलवतात. प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट रंगाचे खास महत्त्व असते.
4/ 8
कडूलिंब: कडुलिंबाच्या फुलोरा तसेच पाने सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि व्यक्ती रोगांपासून मुक्त राहते असे म्हणतात.
5/ 8
बत्ताशांची माळ: आपल्या प्रत्येकाचे आयुष्य हे कटू-गोड आठवणींचे, अनुभवांचे मिश्रण असते. आपल्या आयुष्यातील गोडव्याचे प्रतिक म्हणून बत्ताशांची माळ असते.
6/ 8
कलश: गुढीवर तांब्या उलटा जमिनीच्या दिशेने तोंड करुन ठेवला जातो. जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी, हे मुख्य कारण असते
7/ 8
हार: पूजा करताना हार गुढीला हार घातला जातो. हार हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते.
8/ 8
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)