वास्तुशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीसाठी आणि समृद्ध होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते. आज आपण स्वयंपाकघराच्या बांधकामाबाबत महत्त्वाच्या वास्तु टिप्स जाणून घेणार आहोत. स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम स्थान म्हणजे आग्नेय दिशा. या दिशेचा वापर स्वयंपाकघरासाठी केल्यास आपोआपच अग्नी तत्त्व मजबूत होते. आग्नेय दिशेला स्वयंपाकघर बांधणे शक्य नसेल तर वायु कोन (वायव्य) विचारात घ्यावा आपले स्वयंपाकघर ईशान्येकडे कधीही बांधू नका, कारण यामुळे कुटुंबात मोठे नुकसान किंवा विसंगती होऊ शकते. सिंक उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा, यामुळे घरात पैशाचा प्रवाह सुधारतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)