मेष - मेष राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमी खूप शुभ असणार आहे. नवीन आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कुटुंबात अतिथीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण राहील. सरस्वती वंदना केल्यानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात लाभ होईल. काय करावे : वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करा. काय करू नये : वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रत किंवा पुस्तकाची पाने वाचू नका.
तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमीचा दिवस खूप शुभ असणार आहे. मागील गुंतवणूक दुप्पट नफा मिळवून देणार आहे. सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. पैशाची कमतरता भासणार नाही. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नात्यात गोडवा असेल तर आनंद आणि मनःशांती मिळेल. काय करावे : वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये हळद, केशर, पिवळी फुले, पिवळी मिठाई अर्पण करा. काय करू नये : या दिवशी वादविवाद टाळा.
मकर - मकर राशीसाठी वसंत पंचमीचा दिवस खूप शुभ असणार आहे. या दिवशी तुम्ही खरेदीला जाण्याचा निर्णय घेऊ शकता. व्यावसायिक भागीदारीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. घरामध्ये शुभ कार्य केल्याने तुमचा दिवस खूप चांगला जाईल. गरिबांना आपल्या क्षमतेनुसार दान करा. काय करावे : वसंत पंचमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर पिवळी फुले अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळतील. काय करू नये : वसंत पंचमीच्या दिवशी कागद, पेन, पेन्सिल इत्यादी स्टेशनरी वस्तूंचा अनादर करू नका.