वादग्रस्त धर्मगुरू नित्यानंद हे भारतातले सर्वांत श्रीमंत बाबा आहेत; मात्र ते आता देश सोडून गेले आहेत. त्यांनी इक्वेडोरजवळ एक बेट खरेदी केलं असून, ते तिथं राहतात. लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नित्यानंद बाबाने या बेटाचं नाव कैलास असं ठेवलं आहे. 2003पासून नित्यानंद संत म्हणून त्याचा प्रचार करत आहे. त्याच्याकडे एकूण 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो जगभरात अनेक गुरुकुलं, आश्रम आणि मंदिरं चालवत आहे.