श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी सांगतात करतात की, मीन राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे 4 राशीच्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण सूर्याच्या या राशी बदलामुळे त्यांच्या आरोग्यावर, कौटुंबिक संबंधांवर, आर्थिक बाजूंवर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया सूर्य संक्रमणाचा कोणत्या 4 राशींवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
सूर्य संक्रमण 2023 चा 4 राशींवर विपरीत परिणाम होईल - मेष: सूर्याच्या मीन संक्रांतीचा मेष राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या राशीचे लोक नाहक वादात अडकण्याची शक्यता आहे किंवा त्यांना काही दुःखद माहिती मिळू शकते. या एका महिन्यात तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल आणि उधळपट्टी देखील तुम्हाला त्रास देईल. तुम्हाला असे वाटेल की, काम रखडले आहे आणि कष्ट करण्याचे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत. 15 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान तुमची प्रकृतीही बिघडू शकते.
सिंह: मीन राशीतील सूर्याचे संक्रमण तुम्हाला सुखद परिणाम देणार नाही. कामाच्या ठिकाणी किंवा घरात तुमचे विश्वासू लोक तुमच्या विरोधात कट रचू शकतात. तुम्ही कोणतीही माहिती गोपनीय ठेवून काम करता. या काळात डोळे आणि कान उघडे ठेवून काम करावे. विवाद सोडवण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमची शक्ती, पैसा आणि वेळ वाचेल. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
धनु: सूर्याचा हा राशी बदल तुमच्या जीवनात संमिश्र परिणाम देऊ शकतो. या काळात तुम्हाला मानसिक दबाव जाणवेल, तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक जीवन देखील तणावपूर्ण असू शकते. शक्य असल्यास आपल्या वागण्यावर व बोलण्यावर संयम ठेवा. गोष्टी मनावर घेऊ नका. 15 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान काही अप्रिय माहिती मिळू शकते.
कुंभ : मीन राशीतील सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीच्या लोकांना सावध करणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही षड्यंत्राचे शिकार होऊ शकता. हे टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे, आपलं काम भलं आपण भलं, काम संपवून थेट घरी येणे. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. या काळात कुटुंबात कोणत्याही विषयावर वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात. संयम आणि शांततेने काम करा. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)