Chanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल! पुन्हा लागणार नाही नादाला
Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.
चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं, असं मानलं जातं. त्यांच्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.
2/ 6
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रू या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही गोष्टी सांगितल्या आहेत.
3/ 6
आचार्य चाणक्य म्हणतात, आपल्याबद्दल वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीला जर, शिक्षा करायची असेल तर, आपण आनंदी राहणं हा एक चांगला उपाय आहे. आपण खुश असलो की आपल्याला दुःख देण्याचा विचार करणाऱ्या माणसाला त्रास व्हायला लागतो आणि या त्रासापासून मुक्त होण्याचा त्यांच्याकडे पर्याय उरत नाही.
4/ 6
त्यामुळे ज्या लोकांना आपण आवडत नाही किंवा जे आपल्याला शत्रू मानतात अशा लोकांच्या समोर सतत आनंदी राहा. बऱ्याच वेळा असं होतं की, आपल्या जवळची माणसं आपल्याला फसवता आणि त्यामुळे आपल्याला फारच मनस्ताप होतो. कारण ती व्यक्ती आपल्याला अतिशय जवळची वाटत असते.
5/ 6
त्या व्यक्तीला पण मनातली गुपितं सांगितलेली असतात. त्यामुळे त्यांच्या दूर जाण्याचा आपल्याला त्रास होत असतो, मात्र, चाणक्य म्हणतात, अशा व्यक्तीला धडा शिकवायचा असेल तर, त्या व्यक्ती समोर खुश रहा. त्यामुळे तुम्हाला नामोहर करण्याचा विचार त्या व्यक्तीच्या डोक्यातून निघून जाईल.
6/ 6
उलट तुम्हाला कितीही दुःख देण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही आनंदी राहिलात तर, ती व्यक्ती तुमच्या आनंदाचं कारण शोधण्यात गुंतून जाईल आणि आयुष्यभर त्याचीच वेदना त्यांच्या मनात राहील. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात आपल्या शत्रूंना त्रास द्यायचा असेल तर आनंदी राहण्यात इतका सोपा उपायच नाही.