Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणात गर्भवती महिलांनी अशी घ्या काळजी, पाहा काय करावं आणि काय करू नये
ग्रहणाच्या काळात आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं. विज्ञानानं ही एक खगोल शास्त्रीय घटना असल्याचं सिद्ध केलं असलं तरीही आजही कमी अधिक प्रमाणात अशा काही प्रथांचं पालन केलं जातं.
ग्रहण लागत असण्याच्या काळात कापणे, चिरणे, तळणे अशी कामं करू नयेत. जेवण करू नये अशा अनेक प्रथा पूर्वापार चालत आल्या आहेत.
2/ 7
सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितलं जातं. त्यांनी काय करावं, काय करू नये याचे काही नियम पूर्वापार चालत आलेले आहेत.
3/ 7
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी सूर्याकडे पाहू नये. थेट सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी (Naked Eyes) पाहिल्यास त्याच्या किरणांचा स्त्रियांच्या आरोग्यावर आणि गर्भधारणेवरही वाईट परिणाम होतो, असं मानलं जातं.
4/ 7
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी बाहेर पडू नये. बाहेरील वातावरणाचा, सूर्य किरणांचा गर्भवती महिलेच्या आणि गर्भातल्या बाळाच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. गर्भावर सूर्यग्रहणाची सावली पडू देऊ नये.
5/ 7
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणादरम्यान झोपू नये. गवतावर बसावे. तसंच सूर्यग्रहणापूर्वी आणि नंतर स्नान करावे.
6/ 7
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी अन्नपदार्थांचे सेवन न करता फलाहार करावा असा सल्ला दिला जातो.
7/ 7
हिंदू मान्यतेनुसार, गर्भवती महिलांनी ग्रहण कालावधीत धारदार वस्तूंचा जसं सुरी, कात्री, पिन इत्यादीचा वापर करू नये. यामुळं बाळाला इजा होऊ शकते.