समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म रामनवमीच्या दिवशीच 1608 साली जालना जिल्ह्यातील जांब इथं झाला. रामदास स्वामींच्या घरात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग फोटोंच्या रुपात मांडण्यात आले आहेत.
2/ 10
बलोपासनेचं महत्त्व सांगणारे संत अशी रामदास स्वामींची ओळख आहे. बालपणापासूनच त्यांनी यामध्ये प्राविण्य मिळवले होते.
3/ 10
श्रीराम पंचायतन, रामनवमी उत्सवात पंगतीला तूप कमी पडले होते त्यावेळी समर्थ रामदासांनी राम मंदिरातील समोरील आडातील पाणी काढून खापराच्या घागरीतून वाढले, अशी अख्यायिका सांगितले जाते.
4/ 10
रामदास स्वामींचे मुळ नाव नारायण. ते लहानपणापासून श्रीराम आणि मारूतीचे भक्त होते.
5/ 10
कठोर तपसाधना आणि बलोपासना हा बालनारायणाचा जीवनक्रम होता.
6/ 10
लग्नमंडपात शूभमंगल हा शब्द ऐकताच ते 'सावधान' झाले आणि निघून गेले, असे सांगितले जाते.
7/ 10
रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजेंची भेट घेऊन तत्कालीन परिस्थितीवर चर्चा केली होती.
8/ 10
रामदास स्वामींनी देशपर्यटनाच्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींशी संवाद साधला.
9/ 10
आदिलशहाचा सरदार अफजलखानाच्या स्वराज्यावरील आक्रमणाबाबत त्यांनी शिवाजी महाराजांना पत्रातून सूचक संकेत दिला होता.
10/ 10
संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज या तिघांच्या पुण्यभेटीचा प्रसंग जांब येथील छायाचित्रात दाखवण्यात आला आहे.