Home » photogallery » religion » RAKSHABANDHAN 2022 MANGAL AND RAHU GRAH YUTI ANGARAK YOGA FOUR ZODIAC SIGN TO BE ALERT RP

रक्षाबंधनापूर्वी मंगळ-राहूचा अशुभ योग देईल त्रास; या 4 राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी (नारळी पौर्णिमा) साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन गुरुवारी 11 ऑगस्ट 2022 रोजी आहे. परंतु, रक्षाबंधनापूर्वी मंगळ आणि राहूचा अशुभ योग तयार होत आहे, ज्याला अंगारक योग (Angarak Yoga) म्हटले जाते. अंगारक योग 10 ऑगस्टपर्यंत मेष राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने 27 जून रोजी मेष राशीत प्रवेश केला. तेव्हा राहू आधीच मेष राशीत उपस्थित होता. मंगळ आणि राहूच्या संयोगामुळे मेष राशीमध्ये अंगारक योग तयार होतो. अंगारक योग हा ज्योतिषशास्त्रात अशुभ योग मानला जातो. मात्र, रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी मंगळ-राहूच्या संयोगाने तयार झालेला अंगारक योग संपेल.

  • |