ज्या लोकांच्या घरावर बृहस्पति म्हणजे गुरू ग्रहाची कृपा असते, त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भाविक गुरुवारी उपवास करतात. गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी ब्राह्ममुहूर्तावर स्नान करून भगवान बृहस्पतिची पूजा करावी. या दिवशी व्रत आणि नियमानुसार बृहस्पती देवाची पूजा केल्यानं व्यक्तीचे भाग्य खुलते. बृहस्पतीला कोणत्या गोष्टी आवडतात. काय अर्पण केल्यानं तुम्हाला भगवान बृहस्पतीचे आशीर्वाद मिळू शकतात, याविषयी जाणून घेऊ. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
पिवळे कपडे: पिवळे कपडे भगवान बृहस्पतिला खूप प्रिय आहेत. गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. यानंतर कपाळावर कुंकू किंवा हळदीचा टिळा लावावा. बृहस्पति देवाला पिवळे कपडे खूप आवडतात. म्हणूनच गुरुवारच्या पूजेमध्ये बृहस्पती देवाची मूर्ती पिवळ्या रंगाच्या कपड्यावर स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी. शक्य असल्यास या दिवशी पिवळे कपडेही घालावेत. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
पिवळे पदार्थ : पिवळा रंग बृहस्पतिला अतिशय प्रिय आहे. गुरुवारच्या पूजेमध्ये भगवान बृहस्पतिला पिवळ्या रंगाचे पदार्थ अर्पण करावेत. यासोबत प्रसाद म्हणून गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करा. जर तुम्हीही गुरुवारी व्रत ठेवत असाल तर हे नियम अवश्य पाळा. यामुळे काही दिवसात तुम्हाला बदल दिसेल. घरात सुख-शांती नांदेल. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)