विमला मंदिर, ओडिशा : हे मंदिर पुरी, ओडिशा येथील जगन्नाथ मंदिर संकुलात आहे. हे शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान, मार्कंडा मंदिराच्या कुंडातून मासे पकडले जातात आणि तेथेच शिजवले जातात. त्यानंतर देवी विमला यांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. काही जण बकऱ्यांचा बळीही देतात. जगन्नाथ मंदिराचे मुख्य दरवाजे उघडण्यापूर्वी हे सर्व केलं जातं. (प्रतिकात्मक चित्र)
पारासनिक कोडवू मंदिर, केरळ: हे मंदिर मुत्थप्पनला समर्पित आहे. मुथप्पन मंदिर हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे अवतार मानले जातात. या मंदिरात मुत्थप्पनला मासे अर्पण केले जातात. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असा तेथे भेट देणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे. मंदिरात येणाऱ्यांना मासे प्रसाद म्हणून दिले जातात. (प्रतिकात्मक चित्र)
कामाख्या मंदिर, आसाम: हे भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. तांत्रिक शक्तींवर विश्वास असणारे अनेक लोक कामाख्या देवीची पूजा करतात. हे आसामच्या नीलाचल हिल्समध्ये आहे. इथे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्रसाद अर्पण केले जातात. पण, कांदे आणि लसूण कशातच वापरले जात नाहीत. बकरीचे मांस आणि मासे यांचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात.(प्रतिकात्मक चित्र)