जया किशोरी यांनी त्यांच्या एका सभेत सांगितले होते की, मोर आणि लांडोर यांचा कधीच शारीरिक संबंध येत नसतो. त्या पुढे म्हणाल्या की, अशा परिस्थितीत तुम्ही विचार करत असाल की मोरांना मग अपत्य कशी होतात? याच सभेत त्या पुढे म्हणाल्या होत्या की, मोराचे अश्रू पिऊन लांडोरीची गर्भधारणा होते. याच कारणामुळे भगवान श्रीकृष्ण मोराची पिसे धारण करतात. (न्यूज 18 हिंदी / फाइल फोटो)
त्यामुळे जया किशोरींच्या या दाव्यात किती तत्थ आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. मोराचे अश्रू पिऊन मोराची गर्भधारणा होते का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दाव्यात अजिबात तथ्य नाही. मोर-लांडोर शारीरिक संबंध प्रस्थापित करतात, त्यानंतर लांडोरीची गर्भधारणा होते. (वन्यजीव छायाचित्रकार विजय गोयल यांच्या फेसबुक अकाउंटच्या सौजन्याने)
सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विजय गोयल यांनी मोर-लांडोर यांच्या संभोगाची छायाचित्रे टिपली आहेत आणि ती सोशल साइट्सवरही शेअर केली आहेत. पक्ष्यांना शारीरिक संबंधांसाठी 15 सेकंद लागतात. या दरम्यान, मोराचे शुक्राणू लांडोरीमध्ये हस्तांतरित करतात, ज्यामुळे मोराची गर्भधारणा होते. (वन्यजीव छायाचित्रकार विजय गोयल यांच्या फेसबुक अकाउंटच्या सौजन्याने)