होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. प्रतिपदेला रंग आणि गुलालाने होळी खेळली जाते. होलिका दहनाच्या वेळी मुहूर्ताची विशेष काळजी घेतली जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी काही विशेष उपाय करणे शुभ मानले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, होलिका दहनाच्या वेळी काही गोष्टी अर्पण केल्याने सुख-समृद्धी येते, त्यासोबतच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला रोगांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.