गणपतीच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली. तिनं गणपतीची माफी मागितली. त्यानंतर वृंदानं गणपतीची उपासना केली. तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की, तुला माझ्या पूजेत वर्षातून फक्त एकदात स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल. या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही.
पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पोटी झाला. त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत विवाह झाला. त्याचा मृत्यू होताच तिनं चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला आणि वृक्षरुपात तुळस झाली. त्यानंतर तुळशीला विष्णूपत्नी मानलं जाऊ लागलं. विष्णू पत्नी म्हणून तिची पूजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पूजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीच्या पूजेत तुळशीला मान मिळतो.