Chanakya Niti: जोडीदाराची पारख करताना चुकू नका; लग्नाचा निर्णय घेण्याआधी 5 गोष्टी तपासा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) सांगतात लग्नासारखा मोठा निर्णय घेताना मुलगा किंवा मुलगी यांनी व्यक्तीचा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत कशी आहे हे पहावचं. त्यांच्या सल्ल्यानुसार लग्नाआधीच आपल्या जोडीदाराला मधले 5 गुण ओळखायला हवेत. त्यामुळे कौटुंबिक आयुष्य सुखी आणि समृद्ध होतं. पाहुयात कोणते आहेत ते 5 गुण
1. आचार्य चाणक्य यांच्यामते आपला जोडीदार धार्मिक विचारांचा आहे का हे आधीच पाहिले पाहिजे. धार्मिक विचारांची व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करते. त्यामुळेच लग्नानंतर अशा जोडीदारांचा भाग्योदय होतो.
2/ 5
2. मन संतुष्ट असेल तर, माणूस सुखी होतो. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी, अशा व्यक्ती समाधानी असतात. या व्यक्ती कधीच आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. उलट प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभे राहतात.
3/ 5
3. आपला होणारा जोडीदार धैर्यवान आहे का हे लग्नाआधी जाणून घ्या. कारण आयुष्य प्रत्येक वळणावर सारखं नसतं. अडचणी, कठीण प्रसंग, संकटं आयुष्यात येतच असतात. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समजदारपणे निर्णय घेण्याची ताकद जोडीदारात असायला हवी.
4/ 5
4. आपला होणारा जोडीदार स्वतःच्या रागावर किती नियंत्रण ठेवू शकतो हे देखील पाहायला हवं. प्रत्येकालाच थोडा फार राग येतो. मात्र, ज्या व्यक्तीचं आपल्या रागावर नियंत्रण नाही तो चांगला जोडीदार होऊ शकत नाही.
5/ 5
5. आचार्य चाणक्य यांच्यामते प्रत्येक व्यक्तीने गोड बोललं पाहिजे, गोड बोलण्याने सगळी कामं होऊ शकतात आणि इतरांची मनही जिंकता येतात. गोड बोलणाऱ्या लोकांच्या घरात कायम लक्ष्मीचा वास असतो.