पैशाविषयी - चाणक्यने नीतिशास्त्रात सांगितले आहे की, आपली आर्थिक स्थिती किंवा पैशाशी संबंधित कोणतीही माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नये. श्रीमंत व्यक्तीला प्रभावशाली मानले जाते, त्यामुळे लोक पैशाच्या कमतरतेमुळे त्या व्यक्तीचा आदर करणे सोडून देतात. अशा व्यक्तीला कोणीही मदत करत नाही, उलट इतरांसमोर त्याची चेष्टा केली जाते.
दुःख आणि वैयक्तिक रहस्ये - चाणक्याच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणतेही दु:ख असते तेव्हा त्याने ते आपल्या मनात ठेवावे. आपल्या दु:खाविषयी दुसऱ्याला सांगितल्यास आपण कदाचित उपहासाचे पात्र बनू शकतो. ज्याच्याशी आपण आपली दु:खं वाटून घेतो, त्याच्याशी भविष्यात जर मतभेद निर्माण झाले तर तो आपल्या दु:खाचं रहस्य उलगडून दाखवतो.