

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि टाटा ग्रूपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी कोरोना काळात देखील समाजकार्यात मोठी मदत केली आहे. आज रतन टाटा यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं त्याच्या आय़ुष्यातली एक खास गोष्ट आज जाणून घेणार आहोत. रतन टाटा यांना कार्सची खूप आवड आहे. त्यांचं स्वत: असं कार्सचं जबरदस्त कलेक्शन आहे.


रतन टाटा यांच्या टाटा मोटर्स कंपनीचा जगभरात दबदबा आहे. त्यासोबतच रतन टाटा यांच्याकडे स्वत: असं जबरदस्त कार कलेक्शन आहे. Ferrari California हे कार मॉडेल त्यांचं सर्वात आवडतं आहे. या कारमधून रतन टाटांनी अनेक वेळा प्रवास केला आहे.


टाटा नेक्सन टाटा मोटर्सची सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. ही कार सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. टाटा काही काळ ब्लू डिझेल इंजिन नेक्सनबरोबर प्रवास करताना दिसले आहेत.


Jaguar Land Rover या कंपनीला रतन टाटा यांनी टेकओव्हर केलं. त्यापूर्वीच त्यांच्याकडे Land Rover Freelander गाडी होती. ही कार देखील रतन टाटा यांची आवडती गाडी.