5 भाषांचं ज्ञान असणारी CM उमेदवार पुष्पम प्रिया चौधरीचं बिहारसाठी काय आहे स्वप्न; वाचा सविस्तर
मुख्यमंत्रिपदाची उमेदवार म्हणून वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर स्वत: ची जाहिरात करणारी पुष्पम प्रिया चौधरी ही परदेशात शिकलेली मुलगी राजकारणात पाउल ठेवत आहे. पाटणा जिल्ह्याचील बांकीपूर आणि मधुबनी जिल्ह्यातून बिस्फी विधानसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे. राज्याला देशात पुढे नेण्याचा दावा करणारी पुष्पम ही संयुक्त जनता दलाचे माजी आमदार विनोद चौधरी यांची कन्या आहे. पुष्पमबद्दल जाणून घेऊया.


कोरोना विषाणूची लागण देशभरात होत असताना आणि बिहार विधानसभा निवडणूक सुरू होत असताना बिहारमधील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरील एका जाहिरातीनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या जाहिरातीत एक तरूणी दिसून आली जिचे नाव आहे पुष्पम प्रिया चौधरी. जिच्या नावाखाली मुख्यमंत्रिपदाची उमेदवार 2020 असं लिहीलं होतं. या जाहिरातीमुळे बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा काही महिने आधीच सुरू झाली होती. यातच मार्चच्या अखेरीस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे सर्व कार्यक्रम बंद झाले आणि कोरोनामुळे पुष्पम प्रिया लगेचच गायब झाली.


परंतु पुष्पम प्रिया गायब झाली नव्हती, जसे लॉकडाऊन नंतर सर्व सुरू झालं तेव्हा पुष्पम प्रियाने बिहारचा दौरा करण्यास सुरुवात केली. ती लोकांना भेटत होती. शिक्षक, शेतकरी, समाजसेवक, उद्योजक तरुणांना भेटून आपल्या पक्षाबद्दल माहिती देत होती.


बिहारचा दौरा सुरू करताच पुष्पम प्रिया प्रथम नालंदा जिल्ह्यात पोहोचली. नालंदा हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जिल्हा आहे. तर पुष्पम प्रियाही मिथिला येथील रहिवासी आहे. लंडनहून परत आलेल्या पुष्पम प्रियाने लॉकडाऊन आणि अनलॉक या संपूर्ण कालावधीत लोकांना आपल्या पक्षाशी जोडण्याचं काम केलं.


तसंच पुष्पम प्रियाने सोशल मीडीयातून लोकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. त्याच वेळी ती भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाची घटना घडलेल्या पश्चिम चम्पारण येथे जाऊन पोहोचली. जसजशी निवडणूक जवळ येत आहे हे लक्षात आलं तसं तिने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्याचं ठरवलं आहे.


बिहार निवडणुकीतही उत्सुक असलेल्या पुष्पम प्रियाच्या काळे कपडे घालण्याबाबत जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा तिने नितीश कुमार यांच्या पांढरे कपडे घालण्याबाबत टीका केली. पुष्पम प्रिया हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच अधिकाधिक शिकायला आणि अनुभव घ्यायला ती बिहारमध्ये आली आहे.


पुष्पम प्रिया हिने बिहार विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपल्या योजना आखल्या आहेत. तसंच तिला अनेक उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार आहे. तसंच या वेळी माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा सुद्धा राजकारणात पहिल्यांदा उतरणार आहे.