खडकवासला धरणातून गुरुवारी रात्री उशीरा 25 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खडकवासला धरणातून मुठा नदीत झालेल्या विसर्गामुळे नदीपात्रातलं पाणी वाढलं. नदीतली सगळी जलपर्णी वाहात येऊन भिडे पुलाला अडकली. भिडे पुलाची अवस्था इतकी वाईट झाली आहे. अर्ध्याहून अधिक पुलावर जलपर्णीचा खच पडला आहे. पाण्यामुळे नाही तर जलपर्णीमुळे पुलावरची वाहतूक ठप्प झाली आहे. हे दृश्य बघण्याकरता पुणेकरांनी एकच गर्दी केली. दरवर्षी मुसळधार पावसाने भिडे पूल पाण्याखाली जातो, मात्र यावर्षी भिडे पूल जलपर्णीखाली गेला असल्याचं चित्र होतं.