पोटं गेली खपाटीला, 500 गायी-म्हशींची अशी राखली जाते देखभाल, पाहा हे PHOTOS
पिंपरी चिंचवडमधील पशुवर्धन केंद्रातील गाई-म्हशींना चक्क झाडं तोडून खायला घातलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
(गोविंद वाकडे, प्रतिनिधी)
|
1/ 6
पिंपरी चिंचवडमधील पशुवर्धन केंद्रातील गाई-म्हशींना चक्क झाडं तोडून खायला घातलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2/ 6
या केंद्रात सुमारे साडेपाचशे गायी-म्हशी आहेत. त्यांच्या संगोपनासाठी सरकार लाखो रुपयांचा निधी देते असते.
3/ 6
असं असतानाही पावसाळा असून देखील चारा उपलब्ध न झाल्याने भुकेपोटी ही जनावरं झाडाचा पाला खात आहे की त्यांना खाऊ घातले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कार्यालयात असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचं समोर आलं आहे.
4/ 6
या गंभीर प्रकाराबाबत संबंधित केंद्र प्रमुखांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आपल्याला विसंगत उत्तरे दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे ह्यांनी दिली आहे.
5/ 6
दरम्यान, या केंद्राचे प्रमुख हरिभाऊ देशमुख यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी घडलेला प्रकार आपल्याच केंद्रातील असल्याच मान्य केले आहे.
6/ 6
मात्र ,तोडली जाणारी झाड ही जनावरांच्या पाल्यासाठी नाहीतर नवीन वृक्षारोपण करण्यासाठी तोडली जात असल्याचं अजब उत्तर त्यांनी दिली.