सध्या कोरोनाचं थैमान सुरु असल्याने सगळ्याच कामांवर निर्बंध आलेत. गणेशोत्सव हा सर्व उत्सवाचा राजा असल्याने पुणेकरांचा उत्साह कोरोनाही थांबवू शकला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून घरात बसलेल्या पुणेकरांनी गणपती बाप्पांचं आणण्यासाठी गर्दी केली होती. नेहमीच्या पारंपरिक वेषात आणि थाटात त्यांनी बाप्पांचं स्वागत करत त्यांनी आपल्या घरात आणलं. यावर्षी लोकांच्या शाडूच्या मूर्ती घेण्याकडे जास्त कल होता. पावसाची रिपरीप असली तरी अनेक कुटुंबांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अनेक सोसायट्यांमध्येही गणपती बसविण्यात येणार आहे. नेहमीच्या पारंपरिक वेषात आणि थाटात त्यांनी बाप्पांचं स्वागत करत त्यांनी आपल्या घरात आणलं. पालिकेने गणेशोत्सवासाठी नियमही जारी केले असून सर्वांनी त्याचं पालन करावं असं आवाहन केलं आहे.