पुण्यातल्या Serum Institute ला आग; लसनिर्मितीवर परिणाम? पाहा घटनास्थळाचे LIVE PHOTO
देशालाच नव्हे तर जगाला कोरोना लशीचा (Covid Vacccine) सर्वात मोठा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या (Serum institute fire) औषध कारखान्याला आग लागली आहे. लसनिर्मितीवर परिणाम होणार का? पुण्याच्या हडपसर भागातून थेट दिसणारी ही दृश्य आणि ताजे अपडेट्स
कोरोना व्हायरस (Coronavirus) वर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे.
2/ 5
हडपसरजवळ गोपाळ पट्टीमध्ये असणाऱ्या सीरम प्लांटला आग लागली आहे. याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
3/ 5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड (Covishield)नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही.
4/ 5
सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे
5/ 5
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली, अशीही माहिती मिळते आहे. मात्र करोनाची लस याठिकाणी तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे.