महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. पुणेकरांनाही यावर्षी उन्हानं चांगलंच बेजार केले आहे. पुणे शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुण्यात काल 22 मे रोजी तापमान 39 अंश सेल्सिअस होते. पुण्यात आज 23 मे रोजी तापमान 38 अंश सेल्सिअस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उन्हाचा पार वाढत असल्यामुळे महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.