सुरक्षेतेच्या दृष्टीकोनात सर्व बाबींची पूर्तता करून आजची ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. पुणे मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या चाचणीसाठी 3 कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली होती. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होते.