कोरोनामुळे चैत्र पौर्णिमेलाही जेजुरी सुनी सुनी; गडावर फुलांची सजावट, पण भक्तच नाहीत! पाहा Photo
चैत्र पौर्णिमेला महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाची जेजुरी (Jejuri Khandoba darshan) भविकांच्या गर्दीने फुलून जाते. मात्र गेल्या 14 महिन्यात गडावरचे सगळेच उत्सव रद्द (Maharashtra Lockdown) झालेत. आता ऑनलाइनच घ्या खंडेरायाचं दर्शन
जेजुरी गडावरची यात्रा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक लाखोंच्या संख्येने गडावर गर्दी करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यातूनही भाविक येतात
2/ 8
गेल्या 14 महिन्यात कोरोनामुळे गडावर भाविकांची गर्दी होत नाही. कोरोनाचा कहर कमी झालेला असताना काही प्रमाणात भाविकांना दर्शनासाठी गडाचे दरवाजे उघडण्यात आले होते. पण, आता दुसऱ्या लाटेमुळे वाढती रुग्णसंख्या पाहता मंदिर पुन्हा दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.
3/ 8
मंदिर दर्शनासाठी बंद असं तरी, नित्यनेमाने पहाटेची पूजा,अभिषेक,भूपाळी,आरती,दुपारची मध्यान्ह पूजा आणि रात्रीची शेजपूजा, आरती मोजके पुजारी आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केली जात आहे.
4/ 8
शासनाच्या सुचनेनुसार गडाचे दरवाजे बंद ठेवण्यात आलेत. तसंच, यावर्षीची चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द झाली आहे. त्यामुळे भक्तांना त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन घेता आलं नाही.
5/ 8
कोरोनामुळे चैत्र उत्सव रद्द झाला असाल तरी, पुजारी, सेवेकरी, मानकरी आणि काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आले.
6/ 8
चैत्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली होती. नानासाहेब दिनकरराव पाचुदकर पाटील यांच्या वतीने खंडेरायाचा गाभारा आणि मंदिर फुलांची सजवट करण्यात आली होती.
7/ 8
गेल्या 14 महिन्यांच्या काळात गडावरचे सर्व उत्सव रद्द करण्यात आले. गडावर दर्शनही बंद ठेवण्यात आलंय. गेल्यावेळीही कोरोनामुळे चैत्र उत्सव, सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली.
8/ 8
चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडेरायाला आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. जगावरच कोरोनाचं संकट दूर होऊन, सगळेजण सुखी होवोत अशी प्रार्थना करण्यात आली.