महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह आहे. लोणावळा येथे हे कुटुंब एका कारभाऱ्याकडे कामाला होते. तिथेच ते राहत होतं.
2/ 4
पती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर कारभाऱ्यानं थोडे पैसे देऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये जा असं सांगितलं. महिलेनं कोरोनाबाधित पतीला सोबत घेऊन पुणं गाठलं पती महिलेनं अर्धा तास डॉक्टरांचे पाय धरले तेव्हा तिच्या पतीला दाखल करून घेतलं.
3/ 4
या मायलेकी फक्त दुपारचं जेवण 5 रुपयांत शिवभोजन थाळीच्या रुपात खातात. संध्याकाळी मात्र उपाशी झोपतात. शेजारील शिंदे नावाच्या ताईंनी 2/3 दिवस डबा दिला, पांघरून दिलं.
4/ 4
आता पुढे अजून 8 दिवस काय करायचं असा मोठा प्रश्न या मायलेकीसमोर उभा आहे. कोरोनामुळे माणुसकी ओशाळली आहे. सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. तरी सरकारनं कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडेही लक्ष द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे.