हिंदू धर्मात गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवसापासूनच मराठी नववर्षारंभ होतो. गुढी पाडव्याला अनेकजण शुभ कार्य करतात. तसेच या शुभ दिनी सोन्या-चांदीची खरेदीही केली जाते. पुणे शहराची वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळे अनेकजण गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदी करतात. पुणे शहरातील सराफा बाजारपेठ प्रसिद्ध आहे. गुढी पाडव्यासाठी येथील बाजारपेठेत दागिन्यांच्या विविध व्हरायटी उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. पुण्यात काल (21 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 61079 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55989 रुपये प्रती तोळा इतका होता. पुण्यात आज (22 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 60155 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55142 रुपये प्रती तोळा इतका आहे. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6015 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5514 इतकी आहे. पुणे शहरात चांदीचे दरही 1 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. आजचा चांदीचा दर 72000 रुपये प्रतीकिलो आहे. पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.