कोरोनाशी निकराची झुंज सुरू असतानाच पुण्यातून दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. शहरात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. दिवसभरात पुण्यात 351 नवे रूग्ण आढळून आलेत तर 950 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. सलग 15 दिवसांपासून पुण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला लागला असून ही सकारात्मक गोष्ट असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. शहरात सध्या 12 हजार 285 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 856 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1,54581 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 3 हजार 844वर गेला आहे. आत्तापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 452 जणांनी कोरोनावर मात केली आहे.