पुण्यात दिवसभरात 1736 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. तर दिवसभरात 1456 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यात 54 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 17 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरात 910 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 529 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या 103812 एवढी झालीय. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15973 एवढी आहे. पुण्यात आत्तापर्यंत 2468 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतच 85371 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.