कोरोना लशीसाठी पात्र नागरिकांची संख्या आणि कोरोना लशींची उपलब्धता हे सर्व लक्षात घेता मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोना लसीकरण मोहिमेत बदल करण्यात आले आहेत.
2/ 6
पुण्यात आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून (13 मे, 2021) या नागरिकांना कोरोना लस मिळणार नाही.
3/ 6
फक्त 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनाच कोरोना लस दिली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
4/ 6
45 वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या एकूण 119 केंद्र उपलब्ध असतील. या सर्व केंद्रांवर कोविशिल्ड लस दिली जाईल.
5/ 6
ज्या 45+ नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांंनाच उद्या लस मिळेल. म्हणजेच कोरोना लशीचा फक्त दुसरा डोस मिळेल. पहिला डोस दिला जाणार आहे.
6/ 6
29 मार्चपूर्वी पहिला डोस घेतल्यांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिलं जाईल.