काटेवाडीतील मासाळवाडीत हा प्रयोग सुरू आहे. मुलाणी यांनी सांगितले की, इमारत रस्त्याच्या अगदी कडेला येत होती. पाठीमागे जागा शिल्लक होती. ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करायची झाल्यास ५० लाख रुपये खर्च आला असता. त्यांनी युट्यूबवर सर्च केले आणि हरियाणातील या लोकांचा शोध घेतला.