गेल्या एक तासापासून मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. हे फोटो ठाण्याच्या राम मारूती रस्त्यावरीस आहे. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. तुर्भे स्टेशन रोडवर पाणी जमा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बसरस आहे. पुढील काही तास पावसाचा कडाका असाच राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पुढील 3 ते 4 तास पावसाचा इशारा.. ठाण्यातील कापूरबावडी परिसरात प्रचंड प्रमाणात जमा झालं आहे. ठाणे रेल्वे स्टेशनचं दृश्य..