Healthy Fruits: गॅस, अपचनवर औषधांचा मारा नको; ही 5 फळं पोटाच्या विकारांवर आहेत फायदेशीर
लोकांमध्ये गॅस, अपचन आणि अॅसिडिटीची समस्या खूप वाढल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर किरकोळ वाटत असलेला हा प्रॉब्लेमसुद्धा खूप त्रास देतो. या समस्या कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं आणि घरगुती उपायांचा आधार घेतात. पण, काही फळं देखील आहेत, जी तुमची गॅसची समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या फळांचा आहारात समावेश केल्यानं गॅस तर कमी होतोच पण बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो. इतकंच नाही तर या फळांमधून शरीराला अनेक पोषकतत्त्वंही मिळतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जाणून घेऊया अशाच 5 फळांबद्दल जी खाल्ल्यानं गॅस, अपचन आणि अॅसिडिटीचा (Gas, indigestion and acidity) त्रास खूप कमी होतो.
केळी : केळीमुळे पोटात गॅस होत नाही. केळ्यामध्ये फायबर असतं त्यामुळं गॅस कंट्रोल करण्यात केळी खाणं फायदेशीर ठरतं. केळी खाल्ल्याने अॅसिडिटीही होत नाही.
2/ 5
टरबूज : टरबूज खाल्ल्यानंही गॅसचा प्रॉब्लेम होत नाही. इतकेच नाही तर टरबूजमध्ये असलेले फायबर अन्न पचण्यास मदत करता आणि अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.
3/ 5
काकडी : काकडी खाल्ल्याने पोट थंड राहते, तसेच पोटाची जळजळही शांत होते. यासोबतच शरीर हायड्रेटेड राहते. काकडी खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही.
4/ 5
अंजीर : अंजीर देखील गॅसचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट भरपूर प्रमाणात असतात. बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी घालवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
5/ 5
किवी : किवी अनेकदृष्ट्या फायदेशीर फळ आहे. गॅसचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही किवी खाऊ शकता. नियमित किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते, तसेच आरोग्यासाठी इतर अनेक फायदे होतात. (सूचना : य़ेथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)