Home » photogallery » photogallery » EAT THESE 6 THINGS TO STAY HEALTHY IN SUMMER RP

Health Tips For Summer: उन्हाळ्याचा होणार नाही कसलाही त्रास; या 6 गोष्टींचा आहारात करा समावेश

थंडी संपून उन्हाळी हंगाम (Summer session) सुरू झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू कठीण मानला जातो. या ऋतूत खाण्यापिण्यात थोडेसे दुर्लक्ष केल्यास आजारी पडण्याचा धोका वाढतो. उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्यानं शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होते. थंडीच्या दिवसात असणाऱ्या आपल्या सवयी बदलून उन्हाळी टिप्स वापराव्या लागतील. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'डिहायड्रेशनमुळे अनेक वेळा गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं' असे आहारतज्ज्ञ सांगतात. या ऋतूमध्ये प्रत्येकाने आहारात सकस अन्नाचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे शरीराला ऊर्जा तर राहतेच शिवाय शरीराला डिहायड्रेट होण्यापासूनही वाचता (Health Tips For Summer) येतं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |