साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टआणि अजय देवगण यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे.
हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला आहे.चित्रपटातील आलिया भट्टच्या भूमिकेलासुद्धा खास पसंती मिळत आहे.या चित्रपटात आलिया रामचरणच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. परंतु तुम्हाला माहितेय का आलिया भट्ट आधी इतर काही अभिनेत्रींना Jr. NTR च्या प्रेयसीच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.
कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफला आता पश्चाताप होत असेल. कारण इसाबेलला दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटात आलिया भट्टपेक्षा मोठ्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण इसाबेलने दिग्दर्शकासमोर अशी अट ठेवली की राजामौली ती पूर्ण करू शकले नाहीत. इसाबेलला या चित्रपटात जेनीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. चित्रपटात जेनी ही इंग्लिश स्त्री दाखवण्यात आली आहे. जी ज्युनियर एनटीआरची प्रेयसी असते. इसाबेलला चित्रपट करण्यापूर्वी स्क्रिप्ट वाचायची होती. परंतु राजामौली यांना ते मान्य नव्हतं.
रिपोर्ट्सनुसार, परिणीती चोप्राला 'RRR' ऑफर करण्यात आला होता. सीतेची भूमिका करण्यासाठी तिला संपर्क करण्यात आला होता, त्यांनतर ही भूमिका आलिया भट्टने साकारली आहे. 2019 मध्ये परिणीतीने 'RRR' करण्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती, 'मी फक्त एवढेच सांगेन की तुम्ही लोक थांबा आणि मी आणि निर्मात्यांनी जाहीर केलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा.