महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता उद्योजिका म्हणून सर्वांसमोर आली आहे. नुकताच तिनं प्राजक्तराज हा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केलाय. प्राजक्ताला नुकताच पांडू सिनेमातील निगेटिव्ह भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं काही दिवसांआधीच शेवटच्या केलेल्या गोष्टी सांगितल्या. शेवटची शिवी कधी दिलीस? असा प्रश्न प्राजक्ताला विचारला असता तिनं फार मजेशीर उत्तर दिलं. 'रानबाजारच्या सेटवर शेवटच्या शिव्या दिल्यात आणि भरपूर दिल्यात', असं उत्तर प्राजक्तानं दिलं. रानबाजार ही वेब सीरिज 2022मध्ये रिलीज झाली. या सीरिजमधून प्राजक्तानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. अभिजित पानसे दिग्दर्शित रानबाजार या वेब सीरिजची खूप चर्चा झाली. प्राजक्तानं यात एका वेश्या व्यवसायिकेची भूमिका साकारली होती. यात भूमिकेची गरज म्हणून तिनं अनेक शिव्या दिल्यात. सिगरेट ओढल्यात. तिच्या बोल्ड सीनची सर्वत्र चर्चा झाली होती.