बिग बॉस मराठी 4मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
2/ 8
बिग बॉसमध्ये हाताला फ्रॅक्चर झाल्यानं तेजस्विना गेम सोडावा लागला होता.
3/ 8
तिचा हातही आता बरा झाला आहे. हात बरा होताच तेजस्विनीचा वर्क मोड ऑन झाला आहे.
4/ 8
'थ्री चिअर्स' नावाच्या नव्या सिनेमाच्या शुटींगला तेजस्विनीनं सुरूवात केली आहे. क्लॅपबोर्ड हातात असलेला फोटो शेअर करत तेजस्विनीनं ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.
5/ 8
देवमाणूस 2मध्ये तेजस्विनीनं आमदारीण बाईंचं निगेटिव्ह पात्र साकारलं होतं.
6/ 8
पण नव्या सिनेमात तेजस्विनी एका महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सेटवरील तिचा पोलिसाच्या वेशातील लुक समोर आला आहे.
7/ 8
थ्री चिअर्स या सिनेमाच्या नावावरून तरी सिनेमा धम्माल कॉमेडी आणि अॅक्शन थ्रीलर असेल असं दिसत आहे.
8/ 8
पण हा मराठी की हिंदी सिनेमा आहे याची माहिती समोर आलेली नाही.