सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळं लोकं घरातच आहे. मात्र परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर तुम्हाला फिरायला नक्कीच आवडेल. यासाठी एक खास जागा आता तुमच्यासाठी तयार करण्यात आली आहे.
2/ 9
व्हिएतनाममध्ये जगातलं पहिलं सोन्याचं हॉटेल बांधण्यात आलं आहे.
3/ 9
हे 25 मजली हॉटेल हनोईच्या बा-दीन्ह जिल्ह्यातल्या गियांग वो लेकच्या काठावर आहे.
4/ 9
असे म्हटले जाते की हे हॉटेल 5000 चौरस मीटर एवढे आहे. हे हॉटेल गिलडेड सिरेमिक टाईलमध्ये बांधण्यात आले आहे.
5/ 9
हॉटेलच्या आतील बाजूस काही सोन्याचे पाणी चढवलेल्या सुविधा आहे.
6/ 9
नव्याने उद्घाटन झालेल्या डॉल्से हॅनोई गोल्डन लेक हॉटेलच्या स्विमिंग पुलाजवळही सोन्याची भिंत उभारण्यात आली आहे.
7/ 9
या हॉटेलची लॉबी संपूर्ण सोन्याची आहे. पाहताक्षणी या हॉटेलमध्ये राहण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार आहे.
8/ 9
मुख्य म्हणजे या हॉटेलमध्ये बाथरूमपासून बाथटब, बेसिनपर्यंत सर्व सोन्याचे आहे.
9/ 9
मात्र या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी तुम्हाला 1 हजार डॉलर म्हणजे 74 हजार 679 रुपये मोजावे लागणार आहे.