जर पंतप्रधान मोदींना आपली प्राथमिकता माहित नाही तर ते दुसऱ्यांवर लादू शकत नाहीत. हे हास्यास्पद आहे. कोविड – 19 महासाथीदरम्यान अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण सुरू करण्यासाठी भूमी पूजन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येला जाणार आहेत. आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले – आम्हाला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पंतप्रधान मोदी राम मंदिर निर्माण करीत आहात. आम्हाला याबाबत काहीच तक्रार नाही. यावर खोपरखळी मारत ते पुढे म्हणाले असं वाटतंय की पीएम मोदी आणि कोरोना यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, की 5 ऑगस्ट रोजी कोरोना अयोध्येला येणार नाही.
ते पुढे राज्य सरकारवर हल्ला चढवित म्हणाले – प्रतीकात्मक बलिदानाचा काय अर्थ होतो, हे राज्य सरकारला हे स्पष्ट करायला हवे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारेन कोविड-19 महासाथीदरम्यान 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी सण साजरा करण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. यानुसार घरातच नमाज अदा करावे आणि कुर्बानी देण्यासाठी ऑनलाइन वा फोनवरुन खरेदी करावी.